शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे .

Saturday, 3 October 2015

                                                             मनोगत      (सत्यवान अनारसे )
     
                                                         माझे गुरु
 मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या गुरुचे स्थान अतिशय महत्वाचे असते .
 मी सुद्धा माझ्या गुरुंमुळेचआज या ठिकाणी आहे . मी  इयत्ता १ली  ते ४थी 
 ज्या गुरुजींच्या हाताखाली शिकलो ते माझे गुरु म्हणजे 
श्री ह. भ. प. आनंदराव साळुंके गुरुजी . हे एक महान व्यक्तिमत्व होते .
 त्यांची तत्वे व विचार खूप सुंदर होते . ते एक कीर्तनकार होते . कोणाचाही
 एक रुपया न घेता ते कीर्तन करायचे . परगावी कीर्तनाला गेल्यावर 
दुसऱ्या दिवशी ते सकाळी ७. ०० वाजता शाळेला वेळेवर हजर रहायचे .
 विद्यार्थ्याबद्दलची त्यांची तळमळ ही विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यास
 कारणीभूत ठरली . त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर किंवा यशस्वी
  जीवन जगत आहेत . 
            त्यांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो . त्यावेळी त्यांनी दिलेली
 दिशा व मार्गदर्शन हे मी मरेपर्यंत विसरूच शकत नाही . मी त्यांचे उपकार
 कधीही विसरू शकत नाही . अशा या माझ्या गुरूंना कोटी कोटी 
प्रणाम !!!!!!